शेअर बाजारात चांगली बातमी आणि वाईट बातमी असा फरक नसतो. बातमी असणं हेच महत्वाचं असतं. आंतरराष्ट्रीय बाजारात बातम्यांचे पडसाद वेगवेगळ्या पद्धतीने उमटत असतात. या प्रतिसादांचा अर्थ लावणं हे चातुर्याचं काम असतं. म्हणून आज आपल्या म्हणजे भारतीय बाजाराच्या नजरेतून जगातल्या घटनांकडे बघूया.
गेले काही दिवस बाजारातील एफआयआयने सतत खरेदी केली त्यामुळे मार्केट वर वर जात राहिले यासाठी गुंतवणूकदाराने national stock exchange च्या संकेतस्थळावर एफआयआयच्या खरेदी विक्रीकडे लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे.








