व्हिडीओ ऑफ़ दि डे : BSF जवान गातोय ‘संदेसे आते है’.....सेना दिनाच्या निमित्ताने पाहा हा स्पेशल व्हिडीओ !!

व्हिडीओ ऑफ़ दि डे : BSF जवान गातोय ‘संदेसे आते है’.....सेना दिनाच्या निमित्ताने पाहा हा स्पेशल व्हिडीओ !!

मंडळी, आज भारतीय सेना दिनाच्या निमित्ताने आम्ही एक स्पेशल व्हिडीओ घेऊन आलो आहोत. आजच्या सेना दिनाच्या दिवशी याहून चांगला व्हिडीओ तुम्ही नक्कीच बघितला नसेल.

बॉर्डर सिनेमातलं ‘संदेसे आते है’ हे गाणं भारतीय सेनेवर आधारित आहे, आणि तेच गाणं जेव्हा एक भारतीय सैनिक स्वतः गातो तेव्हा त्याला एक वेगळंच महत्व येतं. नुकतंच एका ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

व्हिडीओत दिसणारा जवान आहे BSF चा सुरिंदर सिंग. त्याने गेल्यावर्षी ‘इंडियन आयडल १०’ मध्ये भाग घेतला होता. तो नेमकं कोणत्या ठिकाणी हे गाणं गातोय याबद्दल समजलेलं नाही. व्हिडीओ ट्विटरवर आल्यानंतर लगेचच व्हायरल झाला आणि तो प्रचंड गाजतोय.

मंडळी, व्हिडीओ मधली एक लक्षणीय बाब म्हणजे सुरिंदर सिंग गात असताना इतर जवान टाळ्या आणि कौतुकांनी त्याला चांगल्याप्रकारे प्रोत्साहन देत आहेत. भारतीय सैन्यातलं टीमवर्क येथेही आपण पाहू शकतो.

तर मंडळी, आज भारतीय सेना दिनाच्या निमित्ताने भारतीय सेनेला बोभाटाचा सलाम. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा !!!

टॅग्स:

marathiBobhatabobhata marathibobhata newsmarathi newsbobatamarathi infotainment

संबंधित लेख