मंडळी, आपल्याकडं असलेला बांद्रा-वरळी सी-लिंक रोड आपल्यासाठी खूप अभिमानाचा आहे. पण हा सागरी पूल काहीच नाही असं दाखवणारा एक पूल चीन आणि हॉंगकॉंगच्या दरम्यान उभारण्यात आलाय भाऊ!. हा पूल ‘हॉंगकॉंग’ आणि ‘मकाऊ’ या शहरांना चीनच्या मुख्य भूभागाशी जोडतोय. आताच्या घडीला हा पूल जगातला सर्वात लांब सागरी पूल ठरलाय आणि तो तब्बल ५५ किलोमीटर लांबीचा आहे. हो, ५५ किलोमीटर्स!! त्यामुळं पूर्वी हॉंगकॉंग ते मकाऊ असणारं ३ तासांचं अंतर या पुलामुळं ते अवघ्या ३० मिनिटांवर आलंय.
२००९ साली या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. पण कामात अनेक अडचणी येत गेल्या. कामगारांचे मृत्यू झाले, बजेट वाढलं. शिवाय भ्रष्टाचारामुळं पुलाचं बांधकाम आणखी लांबणीवर जाऊन पडलं होतं. हे सगळं होत होत शेवटी तब्बल ९ वर्षांनी पूल लोकांसाठी खुला करण्यात आलाय.
चला तर जगातल्या या सर्वात लांब सागरी पुलाबद्दल आणखी माहिती घेऊया.









