चीन आणि अमेरिका यांच्यातलं व्यापारी युद्ध हे उघड उघड चालू असतं. त्यात आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. चीनने अमेरिकेच्या “मदर ऑफ ऑल बॉम्ब”(MOAB)ला उत्तर म्हणून स्वतःच्या “मदर ऑफ ऑल बॉम्ब”ची निर्मिती केली आहे. चीनचा असा दावा आहे की हा बॉम्ब अमेरिकेच्या MOAB पेक्षा अनेकपटीने सरस आहे. चला तर जाणून घेऊया चीनच्या नव्या MOAB बद्दल.
अमेरिका, चीन आणि रशियाने बनवलेत हे महाशक्तीशाली बॉम्ब!! जाणून घ्या या विनाशकारी अस्त्रांबद्दल!!

सुरक्षा साधने तयार करणाऱ्या चीनच्या NORINCO (North Industries Group Corporation Limited) या कंपनीने हा बॉम्ब तयार केला आहे. या बॉम्बच्या विनाशकारी क्षमतेमुळे त्याला चायनीज “मदर ऑफ ऑल बॉम्ब”(MOAB) हे नाव देण्यात आलंय. कंपनीतर्फे या बॉम्बचं परीक्षण करतानाचा व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला होता. H-6K या बॉम्बर विमानाने हा बॉम्ब पाडण्यात आला. बॉम्बच्या परीक्षणाचा व्हिडीओ सार्वजनिकरीत्या दाखवण्याचा हा इतिहासातील पहिलाच प्रसंग म्हणता येईल.
चीनच्या दाव्यानुसार या शक्तिशाली बॉम्बने शत्रूसैन्याचं तळ, इमारती, हत्यारांना झटक्यात नष्ट करता येईल. इतकंच नाही. तर जंगली भागात सैन्याला उतरण्यासाठी ‘लँडिंग झोन’ तयार करण्यासाठी या बॉम्बचा वापर होऊ शकतो.

अमेरिकेच्या MOAB मध्ये आणि चीनच्या MOAB मध्ये काय फरक आहे ?
अमेरिकेच्या मदर ऑफ ऑल बॉम्बचं अधिकृत नाव आहे ‘Massive Ordnance Air Blast’ (MOAB). अमेरिकन सैन्यासाठी अल्बर्ट एल. वायमोर्ट्स यांनी २००३ साली या बॉम्बची निर्मिती केली. हा आकाराने ९ मीटर (२९ फुट) लांबीचा बॉम्ब असून जगातील सर्वात मोठा नॉन-न्युक्लिअर बॉम्ब आहे असा अमेरिकेचा दावा होता. चीनने या बॉम्बला आव्हान देऊन त्यापेक्षा आकाराने केवळ ५ ते ६ मीटर (जवळजवळ १९ फुट) लांब आणि बॉम्बर मधूनही पडता येईल अशा बॉम्बची निर्मिती केली आहे. अमेरिकेच्या MOABला पाडण्यासाठी खास अशा ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टची आवश्यकता असते तर चीनच्या MOABला H-6K सारख्या बॉम्बरमधूनही पाडलं जाऊ शकतं.
दोन्ही हत्यारांमध्ये फक्त एकच फरक आहे. तो म्हणजे, अमरिकेने आपल्या MOAB चा वापर युद्धात केला आहे आणि चीनने नाही. अफगाणिस्तानात या बॉम्बचा वापर इसीस विरुद्धच्या लढाईत झाला होता. त्यावेळी या बॉम्बचं विध्वंसक रूप अख्ख्या जगाने बघितलं. चीनवर अजून तरी अशी वेळ आलेली नाही.

(फादर ऑफ ऑल बॉम्ब)
मंडळी, आई आहे तर बाबा सुद्धा असणारच ना. रशियाने अमेरिकेच्या बॉम्बला उत्तर म्हणून २००७ साली “फादर ऑफ ऑल बॉम्ब” FOAB तयार केला होता. रशियाच्या दाव्यानुसार हा बॉम्ब अमेरिकेच्या MOAB पेक्षा चार पटीने अधिक शक्तिशाली आहे. या दाव्यावर अमेरिकन तज्ञांनी प्रश्न उभे केले होते. यावर रशियाने ११ सप्टेंबर २००७ साली बॉम्बचं यशस्वी परीक्षण करून दाखवलं होतं. रशियाने हा बॉम्ब युद्धात वापरलेला नाही.

कुठला तरी एक तत्ववेत्ता असं म्हणाला होता की या विश्वात सर्व प्राणी शहाणपणाच्या रस्त्यावर चालतात. आणि याला अपवाद फक्त माणसाचा आहे. जो सतत वेडेपणाच्या रस्त्याने धावत असतो. जगातील ३ महासत्तांनी चालवलेल्या विघाताच्या या स्पर्धेत त्या महान तत्ववेत्त्याचं म्हणणं खरं ठरताना दिसत आहे !!
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१