एखादी शारीरिक व्याधी माणसाला दुबळी बनवते की अजून ताकद देते? आपण आजूबाजूला अशी उदाहरणे पांहिली असतील जे हात किंवा पाय गमावल्यावरही जिद्दीने काम करून आपल्या पायांवर उभे आहेत. धडधाकट माणसं कधीकधी बिकट परिस्थितीत हतबल होताना दिसतात पण ही माणसं सकारात्मक राहून लढा देतात. ही गोष्ट अधोरेखित करणारी एक घटना नुकतीच घडली आहे. एका अंध व्यक्ती जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवर चढाई करणारा जगातील तिसरा तर आशियातील पहिला अंध व्यक्ती ठरला आहे.
भेटा माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या आशियातील पहिल्या अंध व्यक्तीला!!


चीनच्या ४६ वर्षीय झांग हॉंग या अंध गिर्यारोहकाने ही कामगिरी करून दाखवली आहे. त्याने नेपाळच्या बाजूने चढाई करत माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला आहे. झांगने २४ मे रोजी ८,८४९ मीटर उंच हिमालयीन चढाई केली. त्याच्यासोबत तीन मार्गदर्शक होते, नुकताच तो बेस कॅम्पमध्ये परतला आहे. अंध असूनही एवढी मोठी कामगिरी केल्याने जगभरात त्याचे कौतुक होत आहे.

झांगचा जन्म चीनच्या चोंगकिंग शहरात झाला. तो लहानपणापासून अंध नव्हता. वयाच्या २१ व्या वर्षी काचबिंदूमुळे त्याने दृष्टी गमावली. दृष्टी गेल्यानंतर त्याचे जगणे खूप अवघड झाले होते. पण मनात काहीतरी करून दाखवायची दुर्दम्य इच्छा होती. तेव्हा त्याला एरिक व्हेनमेयर या अंध अमेरिकन गिर्यारोहकाने माऊंट एव्हरेस्ट सर केला हे कळले. २००१ मध्ये त्याने ही कामगिरी केली होती. झांगने त्यापासून प्रेरणा घेऊन त्याचा गिर्यारोहक मित्र किआंग झी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सुरू केले. ते यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर त्याने माऊंट एव्हरेस्टवर चढाई करायचे ठरले.

तिथला अनुभव सांगताना झांग म्हणतो," मी खरंतर खूप घाबरलो होतो, दिसत नसल्याने चढाई करताना अनेक अडचणी येत होत्या. खूपदा मी पडायचो. पण मनात एक पक्के केले होते की या अडचणी आणि धोके पत्करून पुढे जायचं". झांगने सर्व मार्गदर्शन करणाऱ्यांचे आभारही मानले.
झांग हॉंगमुले "मूकम् करोति वाचालम्, पंगूम् लंघयते गिरीम्!!" याचा खरोखरी प्रत्यय आला आहे
लेखिका: शीतल दरंदळे
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१