'नजर हटी दुर्घटना घटी' हे वाक्य आपल्या परिचयाचं आहे. आज आम्ही तुम्हाला जी कहाणी सांगणार आहोत ती अशीच नजरचुकीची आहे ज्याची काही हजार कोटींची किंमत सिटी बँकेला भरावी लागली.
त्याचं झालं असं की २०१६ साली रेव्हलॉन नावाच्या सौंदर्य प्रसाधनं बनवणार्या कंपनीला मोठ्या कर्जाची गरज होती.रेव्हलॉन हे नाव तुमच्या आमच्या परिचयाचं आहेच त्यामुळे रेव्हलॉन बद्दल फारसं न सांगता पुढे काय झालं ते बघू या. एलीझाबेन आर्डेन नावाची दुसरी कॉस्मेटीक कंपनी विकत घेण्यासाठी रेव्हलॉनला १.८ बिलीयन डॉलरची गरज होती. रेव्हलॉन कंपनीची ख्याती मोठीचअसल्याने कर्ज देण्यासाठी अनेक कंपन्या पुढे आल्या. काही मॅनेजमेंट तर काही फायनास कंपन्या आणि धोका स्विकारायला नेहेमीच तयार असणारे काही हेज फंड पण पैसे गुंतवायला तयार झाले. अशा प्रकारच्या कर्जाच्या योजनेत एखदी वित्तीय संस्था किंवा बँक पुढाकार घेते आणि सगळ्यांच्या वतीने काम करते.







