वादळ, अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी इत्यादी नैसर्गिक आपत्तींच्यावेळी सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. अशावेळी सतत ऐकू येणारा शब्द म्हणजे ‘रेड अलर्ट’. अमुक अमुक ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, अशी बातमी हमखास येत असते. नुकतंच केरळ मधल्या महापुरामुळे केरळच्या काही भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राव, तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का. हे रेड अलर्ट म्हणजे काय ? नैसर्गिक संकटाच्यावेळीच तो का जारी केला जातो ? आज आपण जाणून घेणार आहोत सतर्कतेचा इशारा देण्यासाठी जरी केल्या जाणाऱ्या अलर्ट्स बद्दल.







