गेले काही दिवस कोरोना विषाणूमुळे सर्वजण घाबरलेले आहेत. मोठे लोक फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर चर्चा करत आहेत, पण सध्या सुटी मिळालेल्या आणि परिक्षा रद्द झालेल्या शाळेत जाणाऱ्या मुलांच्या मनातला कोरोना नेमका कसा आहे हा प्रश्न आहे. याचं उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय सायनच्या शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलने. त्यांनी यासाठी ‘आर्ट थेरपी’चा अवलंब केला आहे. त्यांनी केलं काय, सध्या घरीच असलेल्या आपल्या विद्यार्थ्यांना कोरोना विषयावर चित्र काढण्याचा गृहपाठ दिला. हा गृहपाठ विद्यार्थ्यांनी अगदी मन लावून केला आणि चित्रं काढून ती सोशल मिडियावरती शिक्षकांना पाठवली आहेत.
शाळकरी मुलांच्या मनातला कोरोना कसा असेल? पाहा या मुलांच्या चित्रांमध्ये तुम्हांला काय जाणवतंय...


या सायनच्या डी. एस. हायस्कूलमध्ये गेल्या चार वर्षांपासून ‘चित्रपतंग’ नावाचा कलासमूह कला साक्षरता वर्ग भरवतोय. यात विद्यार्थ्यांमध्ये कला साक्षरता आणि दृष्यभान म्हणजेच गोष्टींकडे कलात्मक दृष्टीने कसं पाहायचं या दोन्ही गोष्टी विकसित करण्यावर भर दिला जातो.

हा उपक्रम का?
कोरोनाच्या बातम्या लहान मुलांच्या कानांवर सतत पडताहेत. कोरोनाविषयीची भिती पालकांच्या मनातून मुला-मुलींच्या मनात प्रवेश करतेय, नकळत ती मुलंही याचा विचार करत आहेत. त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांच्या मनातला कोरोना कसा आहे, हे जाणून घेण्याची शाळेला आणि चित्रपतंगला उत्सुकता होती. शिवाय विद्यार्थ्यांच्या चित्रकलेच्या सरावात कोणताही खंड पडू नये अशीही इच्छा होतीच. म्हणूनच त्यांनी विद्यार्थ्यांना हा विषय दिला. विद्यार्थ्यांनीही त्यांची चित्रं व्हाॅट्सअपद्वारे पाठवून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.

चित्रं काढणं ही एक आर्टथेरपी!
कोरोना जगभर पसरलेली महामारी आहे. लहान मुलांच्या संवेदनशील मनावर लहानसहान गोष्टींचे इतके परिणाम होत असतात, तर कोरोनाचेही नक्की पडसाद उमटत असणार आहेत. रोज येणारे जगभरातले व्हिडिओज, मृत्यूचे आकडे, त्यातही आसपासच्या भागात कोरोनाचा एखादा रूग्ण किंवा मृत्यू झाल्यास या सगळ्या गोष्टी बालमनावर परिणाम करत असतात. कधीकधी कोरोनासारख्या आपत्तीच्या आणि त्यानंतरच्या काळातही पालकांच्या किंवा स्वत:च्या मृत्यूचे भय किंवा तशा प्रकारच्या भितीचे पडसाद लहान मुलांच्या मनात अनेक वर्षं उमटत राहतात. हे सगळं चित्राद्वारे किंवा कुठल्याही कला-लिखाणाद्वारे मनातून उतरले नाहीत तर अशा पडसादांचा त्यांच्या मानसिकतेवर दीर्घकालीन परिणाम घडू शकतो. चित्रं काढून स्वत:ला अभिव्यक्त करणं ही एकप्रकारे ‘आर्ट थेरपी’च आहे”, असं मत डी. एस. हायस्कूलमध्ये कला साक्षरतेचे वर्ग घेणा-या प्राची श्रीनिवासन ह्यांनी व्यक्त केलं.
लेखक : कीर्तीकुमार शिंदे
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१