शेयर मार्केट म्हणले की दोन गोष्टी आठवतात. एक म्हणजे कमी वेळेत मिळणार मोठा आर्थिक फायदा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्केट पडल्यावर बुडणारे पैसे. एकतर माणूस श्रीमंत होतो किंवा बुडतो. शेयर मध्ये पैसे लावणे म्हणजे जुगार तर नाही ना, असा प्रश्न अनेक सर्वसामान्यांना पडतो. पण खरंच असं आहे का? अनेकजण आयुष्यभर अभ्यास करून यात नफा मिळवतात. तर काहीजण जोखीम स्वीकारून आपले नशीब बदलतात. नुकतेच एका जोडप्याने २४ वर्षांपूर्वी घेतलेल्या शेयर्समुळे त्यांचा कसा फायदा झाला याची कहाणी लिहिली आहे. काय आहे हा किस्सा, आज पाहुयात.
अमेझॉन हे नाव सध्या कोण ओळखत नाही? सध्या सगळ्यात नामांकित कंपनी आहे. पण कोणतीही कंपनी सुरुवातीला लहान असते, हळूहळू ती यशस्वी होते. अमेझॉन कंपनीचे शेयर घेतलेल्या अनेक कुटुंबांना या कंपनीच्या वाढत्या किमतीमुळे प्रचंड फायदा झाला आहे. नुकतंच एका पती-पत्नीने कंपनीचे संस्थापक जेफ बेझॉस यांना पत्र लिहून त्यांचा अनुभव शेअर केला.







