जगात अशी बरीच माणसं असतात ज्यांचं नाव आपल्याला माहित नसतं, पण त्यांनी बनवलेल्या गोष्टी आपण रोजच वापरत असतो. लॅरी टेस्लर हे अशाच व्यक्तींपैकी एक. लॅरी टेस्लर यांनी तयार केलेली एक गोष्ट आपण दिवसातून निदान एकदा तरी वापरतोच वापरतो. आम्ही ‘कट’, ‘कॉपी’ आणि ‘पेस्ट’ बद्दल बोलत आहोत.
मंडळी, लॅरी टेस्लर यांनीच जगाला ‘कट’, ‘कॉपी’ आणि ‘पेस्ट’ ही कमांड दिली. त्यांनी केलेल्या कामाबद्दल जाणून घेऊया.







