भारत सरकारने जेव्हा पेपरलेस यंत्रणा राबविण्याचा विचार केला तेव्हा या ॲपची संकल्पना समोर आली. 23 डिसेंबर 2015 रोजी लाँच झालेले हे ॲप अजूनही बऱ्याच जणांना माहीत नाही. सरकार तर्फे मिळालेली वेगवेगळी ओळखपत्रे, सर्टिफिकेट्स, महत्वाची कागदपत्रे इत्यादी डिजिटल स्वरूपात तुमच्या मोबाईल अथवा लॅपटॉप मध्ये एकाच ठिकाणी या ॲपमध्ये जतन करता येतात. आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, व्हेईकल रजीस्ट्रेशन, सनद आणि वेळोवेळी मिळालेली सर्टिफिकेट इत्यादी कागदपत्रे त्या त्या डिपार्टमेंट तर्फे या ॲप मध्ये सिंक्रोनाईज केली जाऊ शकतात. या ॲपला सरकारी मान्यता असल्याने गरज असेल तेव्हा तुमची कागदपत्रे तुम्ही डिजिटल स्वरूपात सादर करू शकता. डिजीलॉकर अँड्रॉइड, आयोएस आणि वेब वर उपलब्ध आहे. सरकारी वेबसाईटच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 17 मिलियन लोकांनी डिजीलॉकर वर रजीस्ट्रेशन केले आहे. आता तर रेल्वे सुद्धा या प्रकारे सादर केलेली सॉफ्ट कॉपी स्वीकारत आहे. त्यामुळे प्रवासात कागदपत्रे बाळगण्याची आणि ती गहाळ होण्याची अथवा चोरीला जाण्याची भीती उरली नाही.