तुम्ही अंटार्क्टिक खंडाच्या दिशेने एका मोहिमेवर जात आहात आणि अचानक तुमच्या पोटाच्या उजव्या बाजूला तीव्र वेदना होऊ लागतत, मळमळ जाणवते. ही लक्षणं अपेंडिक्सची आहेत. चांगली गोष्ट ही की तुम्ही एक डॉक्टर आहात आणि वाईट गोष्ट अशी की तिथे तुम्ही एकमेव डॉक्टर आहात. अशावेळी तुम्ही काय कराल ? रशियन डॉक्टरने तर स्वतःच स्वतःचं अपेंडिक्सचं ऑपरेशन उरकलं होतं !! त्याचीच ही गोष्ट.
स्वतःच स्वतःच्या अपेंडिक्सचं ऑपरेशन करणारा डॉक्टर !!


१९६० चं दशक. रशियन सर्जन लिओनीड रोगोझोव हे रशियाच्या सहाव्या अंटार्क्टिक मोहिमेवर होते. या मोहिमेचं उद्देश हे अंटार्क्टिकच्या Schirmacher भागात रशियाचा तळ उभं करण्याचं होतं. मोहिमेला काही महिने झाले असतील नसतील इतक्यात लिओनीड यांना अपेंडिक्सचा त्रास सुरु झाला.
त्यांच्या हे लवकरच लक्षात आलं की तिथे सर्जरी करणारं त्यांच्याखेरीज दुसरं कोणीही नव्हतं. मग त्यांनी काय केलं ? त्यांनी स्वतः ऑपरेशन करायचं ठरवलं, पण हे एवढं सोप्पं नव्हतं. याचं कारण ऑपरेशन नव्हतं तर त्यासाठी लागणारी परवानगी होती.

तो काळ होता शीतयुद्धाचा. या ऑपरेशनमध्ये जर गचाळपणा झाला असता तर लिओनीड तर मेलेच असते ओ, पण त्याहून महत्वाचं म्हणजे अख्ख्या जगात रशियाची नाचक्की झाली असती. रशियाला हे परवडणारं नव्हतं. म्हणून लिओनीड यांना ‘मॉस्को’वरून (रशियाची राजधानी) या ऑपरेशनची परवानगी घ्यावी लागली. आश्चर्य म्हणजे तशी परवानगी मिळालीही.

तर, ऑपरेशन कसं पार पडलं ?
लिओनीड यांनी स्वतःचं पोट उघडलं. त्यापूर्वी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना वेगवेगळी कामं वाटून दिली होती. पोटाचा भाग नीट दिसावा म्हणून एकाने आरसा पकडला होता, तर इतर त्यांना ऑपरेशनचं साहित्य पुरवत होते. सहकाऱ्यांना हे काम बेशुध्द न पडता करायचं होतं आणि अर्थातच लिओनीड यांना सुद्धा.

हे ऑपरेशन २ तास चाललं. लिओनीड यांच्या मुलाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी या ऑपरेशनसाठी आधीच तयारी केली होती, त्यामुळे ऑपरेशन यशस्वीपणे पार पडलं. जर त्यांनी एखाद दिवस उशीर केला असता तर अपेंडिसायटिसची पिशवी फुटली असती.

पुढे काय झालं ?
रशियाची कॉलर टाईट झाली !! रशियन सरकारने लिओनीड यांचं स्वागत हिरो सारखं केलं. त्यांना मानाचा असलेला “Order of the Red Banner of Labour” पुरस्कार देण्यात आला. एवढंच नाही तर त्यांची युरी गागारीन (अंतराळातील पहिला मानव) यांच्याशी तुलना करण्यात आली.
मंडळी, एका अपेंडिक्सच्या ऑपरेशनने एवढं यश पदरात पडूनही लिओनीड हे रशियात आल्यानंतर अवघ्या २ आठवड्यांनी पुन्हा कामावर रुजू झाले. याला म्हणतात कामावर असलेली निष्ठा !!
कशी वाटली ही गोष्ट ?
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१