मंडळी आपल्याला पाश्चात्य संस्कृतीचा बराच पुळका असल्याची तक्रार अनेकदा करण्यात येते. पण समजा इंग्रजांनी भारतीय संस्कृती स्वीकारली तर ? याचं उदाहरण म्हणजे हा व्हिडीओ.
या व्हिडीओत चक्क एक इंग्रज व्यक्ती भारतीयांना संस्कृत मंत्रांचा अर्थ सांगत आहे. शनी आणि शनीच्या दशेबद्दल तो बोलतोय. तो ज्या आत्मविश्वासाने बोलतोय त्यावरून तरी तो नवखा वाटत नाही.
हा व्हिडीओ कुठे काढला गेलाय याबद्दल अजून माहिती मिळालेली नाही. काही दिवसांपूर्वी तो इंटरनेटवर व्हायरल झालाय. .
आम्ही फार काही सांगण्यापेक्षा तुम्हीच हा व्हिडीओ बघा राव. धक्का बसेल.
राव हे म्हणजे आपण पश्चिमेला जात आहोत आणि पश्चिमेची माणसं आधीच पूर्वेत ठाण मांडून बसली आहेत असंच झालं.




