आजच्या पिढीला टाईपरायटर मशीन वापरून माहित नाही. कम्प्युटर, स्मार्टफोनच्या युगात जुनाट टाईपरायटर मशीन वापरायला तरी कशाला हवी ? पण टाईपरायटरच्या महत्वाबद्दल प्रत्येकाने नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. या एका मशीनने भारतातल्या २ पिढ्यांच्या पोटापाण्याची सोय करून दिली होती. हे तुम्हाला माहित आहे का ? स्त्रियांना घराचा उंबरठा ओलांडून नोकरी मिळवून देण्यात याच मशीनचा हातभार होता हे तुम्हाला माहित आहे का ? या लहानशा मशीनने आधुनिक भारताचा इतिहास लिहिला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
आजच्या विशेष लेखात आपण याच टाईपरायटर मशीन विषयी जाणून घेणार आहोत. ही माहिती वाचून तुम्ही टाईपरायटरकडे एका नव्या दृष्टीने बघाल यात शंका नाही.















