व्हाट्सऍप सारख्या सोशल मीडियाला भारतीय पर्याय असावा अशी मागणी आणि इच्छा बरेच दिवस व्यक्त केली जात आहे. अनेक तसे ऍप्स पण बाजारात येऊन गेले. पण व्हाट्सऍपला काय धक्का लागला नाही. आता मात्र थेट भारत सरकार ऍप घेऊन येत आहे.
संदेश नावाचे हे भारतीय ऍप आहे. ऍपल प्ले स्टोर आणि गुगल प्ले स्टोरवर ते दाखल झाले आहे. फेसबुकने इन्स्टाग्राम आणि व्हाट्सऍप आपल्या ताब्यात घेत एकप्रकारे मोठा सोशल मीडिया स्वतःकडे घेतला आहे. सरकारने आणलेले हे ऍप फेसबुकच्या याच मक्तेदारीला उत्तर ठरू शकते.
सध्या हे ऍप सरकारी कर्मचारी आणि सरकारशी निगडित एजन्सी वापरत आहेत. पण लवकरच कुणालाही हे ऍप मोबाईल नंबर टाकून वापरता येणार आहे. सरकारच्या इलेक्ट्रॉनिक आणि आयटी विभागाचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी संसदेत या ऍपबद्दल माहिती दिली आहे.





