सेक्रेड गेम्स ज्यांनी बघितला आहे त्यांना गायतोंडे कोण हे सांगायलाच नको! "कभी कभी लगता है अपुन ही भगवान है..." असं म्हणणार्या गायतोंडेच्या घरावर समजा तुम्हाला रेड टाकायची झालीच तर? अशावेळी तुमची जी अवस्था होईल तशीच अवस्था १४ फेब्रुवारी २०१४ रोजी सकाळी दिल्लीच्या छत्तरपूर मधल्या एका आलिशान हवेलीवर रेड टाकण्यापूर्वी आयकर अधिकार्यांच्या एका पथकाची झाली होती. ही हवेली होती मोईन कुरेशीची !
मोईन कुरेशी हा दिल्लीतली बडी बडी धेंडं ज्याला 'मसीहा' मानायची अशी असामी. कोण होता हा मोईन कुरेशी? मोईन कुरेशी होता एकेकाळी उत्तरप्रदेशातल्या रामपूर मधला एक 'बडे' का मटन एक्स्पोर्टर !! १९९० ला बिझनेसची सुरुवात करून दहा वर्षांत एक नंबरचा बीफ एक्स्पोर्टर बनलेला मोईन कुरेशी! केंद्रीय मंत्रीमंडळातल्या अनेक मंत्र्यांचा खास मित्र! लिकर बॅरन पाँटी चढ्ढाचा जिगरी दोस्त! किती वेगवेगळ्या पध्दतीने या 'मसीहा' ची ओळख सांगायची??? याच मसीहाची दुसरी ओळख म्हणजे मोईन कुरेशी हा भारतातला एक नंबरचा हवाला एजंट!! आज याचीच ष्टोरी आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.


















