मंडळी, आपल्याकडच्या ऐतिहासिक जुन्या वास्तूला जर आग लागली तर आपल्याला ज्या वेदना होतील त्याच वेदना काल फ्रेंच लोकांना झाल्या. नोत्र देम हे फ्रान्सचं जवळजवळ ८५० वर्ष जुनं चर्च आहे. नोत्र देमचा अर्थ होतो “Our Lady”. व्हर्जिन मेरीला हे चर्च समर्पित आहे. पॅरीसचं सौंदर्य बघायला गेलेली प्रत्येक व्यक्ती या भव्य चर्चला भेट देतेच. दरवर्षी १.३ कोटी लोक नोत्र देमला भेट देतात.
नोत्र देम फार जुनं चर्च आहे आणि धार्मिक ठिकाण आहे म्हणून लोकांना वाईट वाटत आहे का ? तर नाही !! नोत्र देम म्हणजे एक इतिहास आहे. गॉथिक पद्धतीने बांधलेलं जगातील सर्वोत्कृष्ट चर्च म्हणून आज त्याची गणना केली जाते. अनेक वर्षापासून वास्तुविशारदांना, इतिहासकारांना भुरळ घालणारं हे चर्च आहे.
नोत्र देमच्या इतिहासावर एक नजर टाकू.