एन्क्रिप्शन म्हणजे एखादी माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवताना तिला सांकेतिक भाषेत बदलणे. म्हणजेच कोणी तिसऱ्या व्यक्तीने ही माहिती चोरण्याचा प्रयत्न केला, तर तिला ती माहिती वाचताच येणार नाही.
भारत, पाकिस्तान, बांगलादेश सहित जगभरातील १०० देशांनी आपली माहितीची देवाणघेवाण गुप्त ठेवण्यासाठी एका स्विस कंपनीची यंत्रणा विकत घेतली होती. पण या सर्व देशांना हे माहित नव्हतं की ज्या कंपनीची यंत्रणा ते वापरत आहेत ती स्वित्झर्लंडची नसून अमेरिकेच्या Central Intelligence Agency म्हणजे CIA सारख्या गुप्तचर संघटनेच्या मालकीची आहे. गेली ५० वर्ष CIA ने या कंपनीच्या आडून १०० देशांवर पाळत ठेवली. ही गोष्ट आता उघड झाली आहे.







