बालाकोटच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर बंद असलेली हवाई हद्द पाकिस्तानने भारतासाठी मोकळी केल्याची कालची बातमी वाचली का ? या बातमीचा अर्थ 'हे शांततेसाठी उचललेले पाऊल आहे किंवा 'पाकिस्तान भारतासमोर नमले' असा आहे असं वाटत असेल तर तसं काही नाही राव !! ही तर पाकिस्तानची 'गरीबी हटाव' मोहीम आहे. सध्या पाकिस्तानला कडकी लागलीय. आई जेवायला घालीना, बाप भीक मागू देईना अशी पाकिस्तानची अवस्था आहे त्यातून या आकाशातून पडणाऱ्या फुकट खैरातीचा रस्ता पण बंद झाला होता.
पण या आकाशातून पडणाऱ्या पैशाच्या पावसाबद्दल सामान्य माणसांना फारच कमी माहिती असते, म्हणून आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एअरस्पेस हवाई नाक्याबद्दल !! टोल कुणाला चुकलाय राव ? जमिनीवरून जा किंवा आकाशातून जा, टोल तो देनाही पडेगा !!!













