एखादा फोटो पाहून हा नक्की कुठला फोटो असेल असा विचार मनात आला की क्रोम ब्राऊझर वापरणारे पटकन इमेजवर राईट क्लिक करून 'सर्च बाय इमेज' पर्याय निवडतात आणि त्या इमेजची पूर्ण कुंडली तुमच्यासमोर सादर होते. आता तर याचं ॲपही आलं आहे. त्यामुळं मोबाईल वापरणाऱ्यांनी कोणतीही इमेज गूगल लेन्समध्ये उघडली की त्या इमेजची सगळी माहिती मिळते. पण हे फीचर आलं कुठून? ते करावं असं गुगलला का वाटलं असेल? आज आम्ही बोभाटाच्या वाचकांसाठी हेच उत्तर घेऊन आलो आहोत.
प्रसिद्ध हॉलिवूड गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेझच्या एका ड्रेसमुळे गूगलला सर्च इंजिनमध्ये एका नवीन फीचरची भर टाकावी लागली आणि जन्म झाला "गूगल इमेज सर्च"चा!!







