उद्या धुळवड आहे मंडळी. धुळवडीसाठी पहिली तयारी ही रंगाची असते. बाजारात तसे हवे तेवढे आणि हवे ते रंग मिळू शकतात, पण समस्या अशी असते की हे रंग रासायनिक असतात. रासायनिक रंगांनी जळजळ, अॅलर्जी, पोटाचे विकार उद्भवू शकतात. हे सगळं माहित असूनही लोकांची पसंती रासायनिक रंगांनाच असते, कारण रसायनीक रंग सहज उपलब्ध असतात आणि कमी खर्चिक पण असतात.
राव खरी गोष्ट तरी अशी आहे की रासायनिक रंगांच्याच खर्चात तुम्हाला नैसर्गिक रंग तयार करता येऊ शकतात. तेही अगदी सोप्प्या पद्धतीने घरच्या घरी. कसं ? ते आज बोभाटा तुम्हाला सांगणार आहे. चला तर या खास टिप्स पाहून घ्या.













