भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) भारताला अवकाशविज्ञानामध्ये नवी ओळख मिळवून दिली आहे. २०१४ सालचं पहिल्याच प्रयत्नात यशस्वी केलेली मंगलयान मोहीम असो किंवा नुकतीच पार पडलेली चांद्रयान-२. काही दिवसापूर्वी आलेल्या बातमीनुसार लवकरच चांद्रयान-३ मोहिमेवर काम सुरु होणार आहे.
आपण इस्रो म्हणत असलो तरी इस्रो या नावामागे मोठी टीम काम करते. देशासाठी त्यांनी केलेलं काम बघता आपल्याला कधी ना कधी तर नक्कीच प्रश्न पडतो की’ या शास्त्रज्ञांना पगार किती असेल?’







