अग्निशमनदलातील या रोबॉटचं एवढं कौतुक का होत आहे ? असं काय काम केलंय त्याने ??

लिस्टिकल
अग्निशमनदलातील या रोबॉटचं एवढं कौतुक का होत आहे ? असं काय काम केलंय त्याने ??

 तुम्ही हॉलीवूडचा ‘वॉल-इ’ सिनेमा पाहिला आहे का? ‘वॉल-इ’ हा रोबो माणसाने पसरवलेल्या प्रचंड कचऱ्याचे लहान लहान ठोकळे बनवत असतो. त्याच्याकडे फक्त एवढंच काम नसतं, तर परिस्थितीप्रमाणे वागण्याची त्याला अक्कल पण असते. मुंबई अग्निशमनदलाकडे पण असाच एक ‘वॉल-इ’ रोबो आहे जो सिनेमातल्या ‘वॉल-इ’ इतकाच कामाचाही आहे.

मंडळी, मुंबई अग्निशमनदलाच्या ‘वॉल-इ’चं नाव आहे ‘रोबोफायर’. आज या रोबोफायरबद्दल सांगण्याचं कारण म्हणजे नुकतीच बांद्र्यातल्या ‘एमटीएनएल’च्या बिल्डींगला आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी अग्निशमनदलाने रोबोफायरचा वापर केला होता. त्याने यावेळी अग्निशमनदलाला आग आटोक्यात आणण्यासाठी महत्वाची मदत केली.

काय आहेत या रोबोफायरचे फायदे ?

काय आहेत या रोबोफायरचे फायदे ?

१. रोबोफायर काही मिनिटांतच तब्बल ३८०० लिटर पाणी सोडू शकतो.

२. आग कशामुळे लागली याचं अचूक कारण रोबोफायर शोधू शकतो.

३. थर्मल कॅमेऱ्यामुळे त्याच्यावर धुराचा परिणाम होत नाही.

४. अग्निशमनदलाच्या अधिकाऱ्यांना अवघड असलेल्या अवघड जागेतही रोबोफायर सहज पोहोचू शकतो.

५. ७०० सेल्शियसच्या तापमानातही काम करण्यासाठी रोबोफायरला तयार करण्यात आलंय.

मंडळी, महानगर टेलिफोन निगमच्या इमारतीला लागलेल्या आगीत रोबोफायरने अग्निशमनदलाच्या अधिकाऱ्यांना जाता येणार नाही अशा धोकादायक ठिकाणी जाऊन आग विझवण्याचं काम केलं आहे. त्याच्या क्षमतेप्रमाणे बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणी, इमारतीच्या तळघरात आणि रासायनिक कारखान्यांना लागलेल्या आगीच्या ठिकाणी रोबोफायर सर्वात जास्त उपयोगी पडू शकतो.

तर मंडळी, या छोट्याश्या रोबोफायरमुळे आता अनेक मोठ्या दुर्घटना टळणार आहेत.

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख