" काय सांगू राव, कोल्हापुरात आमच्या आज्ज्यानी धा एकर जागा घेटलेली, पण आमच्या पावण्याच्या हट्टापायी फक्त लाखभर रुपयात विकली बघा. नाहीतर आज आम्ही त्या धा एकरावर लोकसभेची शिट घेऊन बसलो असतो'. अशा प्रकारची हळहळ तुमच्या कानावर हज्जारवेळा पडली असेल नाही का ?
चुकलेली संधी, हुकलेली श्रीमंती हा नेहेमीच हळहळ करण्याचा विषय असतो. केलेली गुंतवणूक अवेळी विकून टाकण्यासारखा मूर्खपणा बरेचजण करत असतात. म्हणूनच इंग्रजीत थॉमस टसर नावाच्या एका शहाण्याने असं म्हटलंय की A fool and his money soon part the company म्हणजेच "मूर्ख माणूस आणि त्याचा पैसा यांची फार लवकर ताटातूट होते".
आधी जाते अक्कल, मग जाते भांडवल हे सिध्द करणारा एक अफलातून किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.









