नुकतंच पुण्याच्या एका हॉटेलमध्ये स्त्रियांच्या शौचालयात कॅमेरा आढळून आला होता. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे असे प्रकार आता ओळखणे कठीण होऊन बसले आहे. आकाराने लहान आणि त्यापेक्षा लहान चीप सिस्टम असल्याने कॅमेरा सहज लपवता येतो आणि हे सहज ओळखता येत नाही. Oyo आणि Airbnb सारख्या नावाजलेल्या हॉटेल्समध्ये पण असे लपवलेले कॅमेरे आढळून आले आहेत.
...पण हे कॅमेरे कितीही अत्याधुनिक असले तरी एका सोप्प्या मार्गाने ते सहज ओळखता येऊ शकतात. त्यासाठी काय करायचं हे आज जाणून घेऊया.







