अपेक्षा अशी होती की या प्रक्रियेतून स्टर्गन प्रजाती तयार होईल. या कामी हंगेरियन शास्त्रज्ञांनी अमेरिकन पॅडलफिशची निवड केली, कारण त्यांचा असा अंदाज होता की या दोन्ही प्रजाती कधीच एकत्र आलेल्या नसल्यामुळे त्यांच्यात संकर होऊ शकणार नाही. पण झालं उलटच. स्टर्गन आणि पॅडलफिशच्या संकरातून नवीन माशाची प्रजाती जन्माला आली. या नवीन प्रजातीला ‘Sturddlefish’ नाव देण्यात आलं आहे.
Gynogenesis प्रक्रियेत शुक्राणू सोबत DNA चं हस्तांतरण अपेक्षित नसतं. या प्रकरणात नेमकं हेच घडलं. शास्त्रज्ञ म्हणतायत की हा या दोन प्रजातींच्या मंद गतीने होणाऱ्या उत्क्रांतीचा परिणाम आहे. या दोन्ही प्रजाती दुर्मिळ आहेत आणि त्यांच्यात हजारो वर्षात उत्क्रांती झालेली नाही. त्यामुळे त्यांना ‘living fossils’ म्हटलं जातं.