आजकाल जो तो उठतो तो इंजिनिअरिंग करतो. पण इंजिनिअरिंग काही इतकंही सोपं नसतं. त्यात इंजिनिअरिंगच्या मुलांना ट्यूशन देणे म्हणजे महाकठीण काम. त्यासाठी तुमचा अभ्यास दांडगा असावा लागतो. पण जर आम्ही तुम्हाला सांगितले की एक ११ वर्षांचा मुलगा इंजिनिअरिंगच्या मुलांना शिकवतो तर तुम्हाला हे पटेल का? पटो वा ना पटो, पण हे सत्य आहे राव!!
वय अवघं ११ वर्ष आणि इंजिनिअरिंगच्या मुलांना शिकवतो ? कोण आहे हा पठ्ठ्या !!


हैद्राबादचा मोहम्मद हसन अली सध्या त्याच्या इंजिनिअरिंगच्या ट्यूशनमुळे चर्चेत आहे. हा पठ्ठ्या थेट बी. टेक. आणि एम. टेक.च्या पोरांना डिझायनिंग आणि ड्राफ्टिंग शिकवतो. मोहम्मद अली त्याच्या त्याच्या शिकवणीच्या पद्धतीबद्दल सांगतो की, तो आधी इंटरनेट वरून शिकून घेतो मग तीच माहिती तो त्याच्या विद्यार्थ्यांना शिकवतो.
मंडळी, हा गडी एकही रुपयाही न घेता फुकट शिकवतो. तो सांगतो की ही गोष्ट मी देशसेवा म्हणून करत आहे. जिथे लोक म्हातारे होऊनही पैसा-पैसा करणे सोडत नाहीत तिथे हा भाऊ एवढ्या कमी वयात प्रचंड पैसे कमवायची संधी असतानासुद्धा फुकट शिकवतो. ही खरच कौतुकास्पद गोष्ट आहे राव! तो सांगतो की मी इंटरनेटवरून सगळे शिकतो म्हणून मला शिकण्याचा खर्च लागत नाही. मला मोफत शिकायला मिळते म्हणून मी दुसऱ्यांना मोफत शिकवतो. २०२० येईपर्यंत मोहम्मदच्या विद्यार्थ्यांचा आकडा किमान हजार इंजिनियर्सपर्यंत पोचेल.

इंजिनिअरिंगचा अभ्यास आणि परत ते विद्यार्थ्यांना शिकवणे, त्यात हा स्वत: लहान म्हणजे खेळणे आलेच.. हे सगळे कसे मॅनेज करतो असे विचारल्यावर तो सांगतो की, 'मी गेल्या एक वर्षापासून हा इंजिनिअरिंगचा अभ्यास करत आहे. माझी शाळा सकाळची असते. मी 3 वाजेपर्यंत घरी येतो, थोडावेळ खेळतो, होमवर्क करतो आणि नंतर मी 6 वाजता ट्यूशन घ्यायला जातो.
त्याचे विद्यार्थी सांगतात की हा भाऊ भन्नाट शिकवतो, त्याच्याकडे ट्यूशन लावल्यावर येणारा अनुभव अफलातून आहे. एवढ्या कमी वयात गोष्टीं सोप्या करून सांगण्याची त्याची स्किल भारी आहे. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची आयडीया पण त्याला नेटवरच मिळाली.

तो सांगतो की इंटरनेटवर एक व्हिडीओत परदेशात मुलं शिकत असताना काहीतरी नौकरी करत असतात असं पाह्यलं. मग आपण पण असंच काहीतरी करावे अशी त्याला आयडीया आली. थोडा विचार केल्यावर त्याला वाटले की आपण इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. पण त्यांना शिकवायचे काय हा मोठा प्रश्न त्याच्या पुढे होता. विचार केल्यावर त्याच्या लक्षात आले की इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना कम्युनिकेशनचे प्रॉब्लेम्स जास्त येतात. मग अशावेळी त्यांना कम्युनिकेशन स्किलचे धडे देणे योग्य होईल, सोबतच त्याचा आवडता विषय म्हणून डिझायनिंग..
काय मंडळी, भारी आहे ना हा मुलगा. आपल्याला राव स्वत:चा अभ्यास स्वत: करता येत नाही आणि हा एवढासा मुलगा मास्टर्सच्या विद्यार्थ्यांना शिकवतोय.. मानलं या भावाला!!
लेखक : वैभव पाटील
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१