चांगल्या शिक्षणाचा विषय येतो तेव्हा परदेशी विद्यापीठांकडे आणि तिथल्या शिक्षण व्यवस्थेकडेच पाहिलं जातं. भारतापेक्षा बाहेरची विद्यापीठं कशी गुणवत्तापूर्ण असतात याची उदाहरणे दिली जातात. पण ह्या समजुती खोट्या ठरवणारी एक अतिशय चांगली बातमी आली आहे. Quacquarelli Symonds (QS) ने भारतीय विज्ञान संस्था बेंगळुरूला (IISc) २०२२ वर्षातील जागतिक स्थरावर अव्वल संशोधन विद्यापीठात स्थान दिले आहे. citations per faculty (CPF) च्या आकडेवारीनुसार IISc बेंगळुरूला १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत.
जागतिक क्रमवारीत भारतीय विद्यापीठांनी बाजी मारली आहे...कोण कितव्या क्रमांकावर आहे पाहून घ्या !!


QS ही खासगी ब्रिटिश संस्था दरवर्षी विद्यापीठांची क्रमवारी जाहीर करते. विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर, परदेशी विद्यार्थ्यांची संख्या, संशोधन, गुणवत्ता, नोकरीच्या संधी अश्या अनेक निकषांवर ही क्रमवारी जाहीर करण्यात येते. त्यानुसार २०२२ साठीची क्रमवारी नुकतीच जाहीर झाली. जगभरातील १३०० शिक्षण संस्था यामध्ये सहभागी होत्या. भारतासाठी आनंदाची बाब म्हणजे या क्रमवारीत भारतातील ३५ शिक्षण संस्थांची निवड झाली आहे. या ३५ विद्यापीठांमध्ये IIT संस्थाही आहेत.

जागतिक क्रमवारीत टॉप ३ मध्ये मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी या तीन संस्था आहेत. महाराष्ट्रातील ३ विद्यापीठाचाही या क्रमवारीत समावेश आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आपली कामगिरी उंचावत ५९१ ते ६०० या गटात स्थान मिळवले आहे. मुंबई IIT संस्थेने पहिल्या २०० मध्ये स्थान मिळवले आहे, तर मुंबई विद्यापीठाचा १००१ ते १२०० या गटात नंबर लागला आहे. भारतातील IIT सारख्या संस्थांचा यात वरचा क्रमांक लागतो. IIT मुंबई, IIT बंगलोर, IIT दिल्ली, IIT मद्रास, IIT कानपुर, IIT गुवाहाटी, IIT खरगपूर, IIT रुरकी यांचा जागतिक क्रमवारीत पहिल्या ४०० मध्ये नंबर लागतो. दिल्ली विद्यापीठ ५०१-५१० गटात आहे, तर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) प्रथमच जागतिक क्रमवारीत ६०० च्या गटात आले आहे.

दरवर्षी जगभरातून अनेक विद्यार्थी भारतात शिक्षणासाठी येत असतात. त्यासाठी शैक्षणिक संस्था आपले मूल्यांकन कसे वाढेल यासाठी धडपडत असतात. QS ने दिलेल्या आकडेवारीमुळे भारतीय शिक्षण संस्थांचं नाव जागतिक स्थरावर उंचावलं आहे. भारतीय मुलांनाही ही क्रमवारी पाहून भारतात किती गुणवत्तापूर्ण विद्यापीठे आहेत हे लक्षात येईल. येणाऱ्या काळात या क्रमवारीत भारतातील इतर अनेक संस्थांची नावे पाहायला मिळतील आणि उच्च शिक्षणासाठी भारतात राहूनच विद्यार्थ्यांना अनेक संधी मिळतील अशी आशा करायला हरकत नाही.
लेखिका: शीतल दरंदळे
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१