इन्कमटॅक्स रिटर्न भरताय ? या ५ गोष्टी माहित आहेत का ?

इन्कमटॅक्स रिटर्न भरताय ? या ५ गोष्टी माहित आहेत का ?

करदात्यांसाठी एक खुशखबर आहे राव. इन्कमटॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै ऐवजी ३१ ऑगस्ट करण्यात आली आहे. आता तुम्ही ३१ ऑगस्ट पर्यंत इन्कमटॅक्स रिटर्न भरू शकता. यासंदर्भात आजच निर्णय घेण्यात आला. भारतातील अनेक भागात इन्कमटॅक्स भरण्यात अडचणी येत असल्याने अंतिम तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

मंडळी इन्कमटॅक्स संदर्भात काही मुद्दे समजून घेणं महत्वाचं आहे.

स्रोत

१. आयटी रिटर्न्स फाईल करताना यावेळी करदात्यांना जीएसटीची माहिती द्यावी लागणार आहे.

२. २०१७ ते २०१८ या आर्थिक वर्षात ३ महिने vat कायदा लागू होता व उरलेले ९ महिने जीएसटी लागू होता. आधीच्या कायद्यानुसार अप्रत्यक्ष कर आणि इतर माहिती देण्याची गरज नव्हती. पण आता जीएसटीची माहिती देणं बंधनकारक आहे.

स्रोत

३. करदात्याला खरेदी विक्रीवरील सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी, यूटीजीएसटीच्या क्रेडिटची माहिती द्यावी लागेल. ही माहिती जीएसटी पोर्टलवरील इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर रजिस्ट्ररसोबत जुळवून घ्यावी लागणार आहे.

४. तुम्ही इन्कमटॅक्स रिटर्न ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही मार्गांनी भरू शकता. ई-फायलिंगसाठी तुम्हाला https://www.incometaxindiaefiling.gov.in/home या वेबसाईटवर जावं लागेल.

५. ई-फायलिंग करताना तुम्हाला लॉगईन करावं लागेल. लॉगईनसाठी तुम्हाला युझर आयडी, पासवर्ड आणि जन्मतारीख द्यावा लागेल. युझर आयडी नसेल तर तुम्ही नवीन युझर आयडी बनवू शकता.

 

आणखी वाचा :

Form 15H : आपल्या आई बाबांसाठी तुम्हाला हे वाचलंच पाहिजे !!

टॅग्स:

Bobhatamarathi newsmarathi bobhata

संबंधित लेख