देशात अनेक तरुण हे प्रचंड उत्साही आणि कार्यक्षम असतात. काही ना काही करण्यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असते. यात काही तरुण असे देखील असतात, जे अशा गोष्टी निर्माण करून दाखवतात जे मोठमोठ्या संस्थांमध्ये शिकून देखील अनेकांना जमत नाहीत.
तमिळनाडू येथील एक विद्यार्थी रियासदीन समसुद्दीन याने जगातला वजनाने सर्वात हलका उपग्रह तयार करून दाखवला आहे. या भारतीय तरुणाच्या शोधणे नासाचेही लक्ष वेधले आहे. एवढे की खुद्द नासाच या उपग्रहांना अवकाशात पाठवणार आहे. चला तर सविस्तर माहिती घेऊया.






