रेल्वे रुळावर धावतायत ट्रक ??...कारण वाचून रेल्वे कौतुक कराल !!!

लिस्टिकल
रेल्वे रुळावर धावतायत ट्रक ??...कारण वाचून रेल्वे कौतुक कराल !!!

भारतात रेल्वे ही अत्यंत महत्वाची वाहतूक सेवा आहे. सामन्यातील सामान्य माणसाला रेल्वेचा प्रवास परवडतो त्यामुळे रेल्वे कधीही थांबत नाही आणि ती कधी रिकामी पण नसते. या कारणाने रेल्वे रुळांची डागडुजी हा एक किचकट प्रकार होऊन बसला आहे. एवढ्या वर्षात रेल्वे विभागाने यावरही आयडिया शोधून काढली आहे. त्यातलाच एक महत्वाचा भाग म्हणजे हॉपर ट्रक्स.

हॉपर ट्रक्स म्हणजे काय ?

मंडळी, सोप्प्या मराठीत रेल्वे रुळावरवर चालणारे ट्रक म्हणजे हॉपर ट्रक्स. हॉपर ट्रक्स हे मुळात डम्पर ट्रक असतात. त्यांचातला महत्वाचा बदल म्हणजे त्यांचे चाक. रबराच्या चाकांच्या जागी खास डिझाईन केलेले लोखंडी चाक बसवलेले असतात. या चाकांमुळे डम्पर ट्रक रेल्वे रुळांवर सहज धावू शकतात.

हॉपर ट्रकचा वापर कशासाठी होतो ?

हॉपर ट्रकचा वापर कशासाठी होतो ?

मंडळी, हॉपर ट्रकचा वापर रेल्वे रुळावर खडी टाकण्यासाठी होतो. या कामाला ‘बॅलास्टिंग’ म्हणतात. तुम्ही पण रेल्वे रुळावर खडी नक्कीच पहिली असतील. कधी विचार केला आहे का यांचा काय उपयोग होतो ? मंडळी, या खड्यांमुळे रेल्वे रूळ मजबूत व स्थिर राहतो ज्यामुळे अपघात होत नाही. सोबतच रेल्वेचा वेग राखता येतो.

हॉपर ट्रकमुळे ‘बॅलास्टिंग’चं काम अगदी सोप्पं झालं आहे. फक्त ओझं वाहून नेण्यासाठी नाही तर हॉपर ट्रकमुळे हव्या त्या जागी बॅलास्टिंग करता येतं. पूर्वी हेच काम रेल्वे कामगारांना करावं लागायचं. त्यासाठी वेळ आणि पैसा खर्ची जायचा. आता हॉपर ट्रकमुळे हे काम जलद होत आहे.

मंडळी, भारतीयांना ‘जुगाडी’ म्हणतात, पण रेल्वे विभागाने केलेला हा जुगाड फक्त जुगाड नसून तो एक महत्वाचा शोध आहे. तुम्ही काय म्हणाल रेल्वेच्या या हुशारीबद्दल ?? कमेंट नक्की करा !!

 

 

आणखी वाचा :

सोशल मिडिया नसलेल्या काळात एका कांद्याने वाचवला होता महिलेचा जीव ?? वाचा हा अज्ञात किस्सा !!

रेल्वेच्या डब्यावर हे नंबर का असतात भाऊ ? काय आहे या मागील लॉजिक ?

आता तुम्हाला जाता येणार खऱ्याखुऱ्या 'मालगुडी' स्टेशनला....पत्ता बघून घ्या राव !!

रेल्वेचे ब्रेक कसे काम करतात माहित आहे का ?

डायमंड क्रॉसिंग फक्त नागपुरातच आहे ?? प्रत्येक नागपूरकराने हे वाचलंच पाहिजे !!

वेगवेगळ्या ११ प्रकारचे हॉर्न वाजवते रेल्वे : त्यांचा अर्थ तुम्हाला माहित आहे का ?

'काला बकरा' ते 'सिंगापूर रोड' - भारतातील ११ म‌जेदार‌ रेल्वे स्टेशन्स‌!!

टर्मिनस, सेन्ट्रल, जंक्शन मधला फरक माहित्ये का ?

शकुंतला रेल्वे: का बरे अजूनही भारतीय रेल्वे देते ब्रिटिश कंपनीला पैसे?

सर्वात लांबलचक नांव असलेलं रेल्वे स्टेशन कोणतं माहित आहे? नसेल तर मग नक्कीच वाचा..

टॅग्स:

bobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobatabobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi news

संबंधित लेख