मिस्टर बिनचं कार्टून पाह्यलंय? प्रश्नच नाही. तर या मिस्टर बिनमध्ये एक थ्री व्हीलर कार नेहमी दाखवली जायची. तिचं नाव होते रिलायंट रोबिन!! तर या रिलायंट रोबिनची जुळी बहीण आपल्या भारतातसुद्धा होती. तिचे नाव होते सिपानी बादल!!
भारतात बनलेल्या तीनचाकी कारबद्दल कधी ऐकलंय? वाचा या कारकंपनीच्या उत्कर्ष आणि ऱ्हासाची गोष्ट!!


ही कार सुरुवातीला सनराईज ऑटोमोटिव्ह लिमिटेड(SAIL) यांच्यामार्फत बनविली जात होती. पुढे जाऊन तिचे नाव सिपानी लिमिटेड करण्यात आले. बादल १९७६ला मार्केटमध्ये आली. तीन चाकी आणि तीन दरवाजे अशी या कारची डिजाईन होती. पॅसेंजर साईडला दोन दरवाजे, तर ड्रायव्हर साईडला एक दरवाजा अशी या कारची रचना करण्यात आली होती. या गाडीत ३-४ लोक आरामात बसू शकत असत. या कारला १९८सीसी ४ स्ट्रोक पेट्रोल इंजिन होते. ही कार फायबर ग्लासची बनविण्यात आली होती.

पहिल्या वर्षी बादल कारचे १७९ युनिट विकले गेले. त्याच्या पुढच्या वर्षी ३३१ युनिट विकले गेले. पण त्याच्याच पुढच्या वर्षी मागणीत मोठी घट झाली आणि फक्त १०४ कार्स विकल्या गेल्या. पुढे ५१ आणि नंतर ३१ कार्सची विक्री असा उतरता प्रवास या कारने केला. राम बलराम नावाच्या एका सिनेमातसुद्धा ही कार दाखवली गेली होती. लोकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही हे बघून कंपनीने मग यातच बदल करून ४ व्हीलर कार मार्केटमध्ये आणली.

पण तेवढ्यात भारतीय मार्केटमध्ये मारुती ८००चा प्रवेश झाला होता. मारुतीपुढे भल्या भल्या कंपन्याना गाशा गुंडावा लागला. सिपानी पण त्यातलीच एक!!! हळूहळू करत १९९० साली सिपानी बंद झाली आणि अजून एका दमदार कारचा अंत झाला.
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१