देशात एखादा सोहळ्याप्रमाणे आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या आयपीएलचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ९ एप्रिल पासून सुरू होणारी ही स्पर्धा दीड महिने चालून ३० मे रोजी संपणार आहे. पहिला सामना हा चेन्नई येथे मुंबई आणि बँगलोर दरम्यान खेळला जाणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना हा अहमदाबाद येथे नवीन तयार करण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.
आयपीएल २०२१ ची विशेषतः म्हणजे यावेळी कुठलाही संघ त्यांच्या होम ग्राऊंडवर खेळणार नाही. तसेच यावेळी सर्व ५६ सामने हे मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, बँगलोर याच शहरांतील मैदानांवर खेळले जाणार आहेत. कोरोनामुळे यावेळी हे सामने विविध ठिकाणी न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.






