व्हिडीओ ऑफ दि डे : तब्बल ३ लाखांची लग्नपत्रिका ? काय खास आहे या लग्नपत्रिकेत ?

व्हिडीओ ऑफ दि डे : तब्बल ३ लाखांची लग्नपत्रिका ? काय खास आहे या लग्नपत्रिकेत ?

सध्या २ लग्नं चर्चेत आहेत. एक आहे रणवीर दीपिकाचं लग्न तर दुसरं आहे इशा–आनंदचं लग्न. यापैकी इशा अंबानीचं लग्न हे महागड्या लग्नपत्रिकेसाठी जोरदार चर्चेत आहे. Dolce & Gabbana या सुप्रसिद्ध फॅशन हाऊसने ही लग्नपत्रिका डिझाईन केली आहे. तुम्हाला धक्का बसेल, या एका लग्नपत्रिकेची किंमत तब्बल ३ लाख रुपये आहे भाऊ. आता तुम्ही म्हणाल ३ लाख सारखं यात काय आहे ? तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

प्रश्न पडला ना, हे नक्की ३ लाखाचं आहे का म्हणून ? चला आता थोडक्यात सांगतो आत काय काय आहे ते.

पत्रिकेच्या सुरुवातीलाच इशा आणि आनंद पिरामल यांच्या नावाचं पाहिलं अक्षर दिसत आहे. पत्रिकेच्या आत धीरूभाई आणि कोकिलाबेन अंबानी तसेच आनंद पिरामलच्या आजी आजोबांची नावे लिहिली आहेत. पुढे लग्न सोहळ्याची माहिती देणारं पत्रक आहे. यासोबत इशा आनंदने लिहिलेली खास नोट पाहायला मिळते. याशिवाय आत आणखी एक बॉक्स ठेवलेला आहे. हा लहान बॉक्स उघडल्यानंतर गायत्री मंत्र सुरु होतात. यात ४ कप्पे आहेत. प्रत्येक कप्यात निमंत्रितांसाठी खास भेटी ठेवलेल्या आहेत.

स्रोत

मंडळी, अंबानी कुटुंबीय नेहमीच त्यांच्या महागड्या सेलिब्रेशनसाठी ओळखले जातात. पण पत्रिका काही तेवढी भारी नाही वाटली राव. पत्रिकेत एवढी रद्दी ठेवली आहे, म्हणजे नक्की किती सोहळ्यांची आमंत्रणं आहेत ? आणि शेवटी निमंत्रितांसाठी काय आहे तर ४ एकाच प्रकारच्या माळा. बस्स !! सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्याकडे असतं तसं, ‘आमच्या ताईच्या लग्नाला यायचं हं’ हे कुठे आहे ? भाऊबंदांतल्या खंडीभर नावांशिवाय पत्रिकेला मजा असते का ? निदान आकाश आणि अनंत या दोघांची तरी नावं असायला हवी होती नाही का ? अंबानी रावांनी आपल्याकडच्या पत्रिका एकदा चाळून बघायला हव्या होत्या.

राव, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला सांगायला विसरू नका. कमेंट बॉक्स तुमचाच तर आहे !!

टॅग्स:

marathiBobhatabobhata marathibobhata newsmarathi newsbobatamarathi infotainment

संबंधित लेख