इस्रो आता शत्रूंच्या रडारवरसुद्धा नजर ठेवू शकेल... पाहा बरं यावेळी किती उपग्रह अवकाशात सोडण्यात आलेत !!!

लिस्टिकल
इस्रो आता शत्रूंच्या रडारवरसुद्धा नजर ठेवू शकेल... पाहा बरं यावेळी किती उपग्रह अवकाशात सोडण्यात आलेत !!!

राव इस्रोची अंतराळवारी म्हटलं की निदान २० उपग्रह तरी असणारच हे ठरलेलंच असतं. इस्रोने आज केलेल्या कामगिरीत पण जुनी परंपरा कायम ठेवली आहे भाऊ. इस्रोने भारताचं Emisat आणि तब्बल २८ परदेशी उपग्रहांना यशस्वीपणे अवकाशात सोडलं आहे. चला तर इस्रोच्या कामगिरीबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

इस्रोचं मिशन कधी एकट्यासाठी नसतं राव. आजचं मिशन पण तसंच होतं. अमेरिकेचे २४ उपग्रह तर लिथुएनियाचे २ आणि आणि स्पेन व स्वित्झर्लंडचे प्रत्येकी एक नॅॅनो उपग्रहांना इस्रोच्या PSLV-C45 यानातून अवकशात प्रक्षेपित करण्यात आलं आहे.

भारताचं एकमेव Emisat हे उपग्रह DRDO म्हणजे संरक्षण संशोधन व विकास संस्थेसाठी अत्यंत महत्वाचं आहे. Emisat मुळे भारताला सुरक्षा व्यवस्थेत मदत होणार आहे. आता भारत फक्त आपल्यावर टेहळणी करणारी सॅटेलाईटच पाडणार नाही तर आपली येणारी विमानं टिपू शकणारे रडार कुठे असतील याचीही माहिती आपल्याकडे आधीच असू शकते.

मंडळी आजवर PSLV ने ज्या ज्या कामगिऱ्या पार पडल्या सर्व यशस्वी झाल्या आहेत. आजची कामगिरी पुन्हा एकदा यशस्वी झाली आहे. त्यासाठी इस्रो आणि सर्व शास्त्रज्ञांचे बोभाटातर्फे अभिनंदन !!

टॅग्स:

bobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobatabobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi news

संबंधित लेख