एका छोट्याशा खेड्यातील मुलगी सध्या भल्याभल्यांना चकित करत आहे. एवढ्याशा वयात या चिमुरडीने मोठी कमाल केली आहे. मंडळी, तुम्ही कधी असे ऐकले आहे का भारतातल्या एखाद्याचे इंग्रजी ऐकून साक्षात इंग्रजांचे तोंड बंद झाले आहे? ही पोरगी जेव्हा इंग्लिश बोलायला लागते तेव्हा इंग्रज सुद्धा डोळे फाडून बघत असतात आणि केवळ इंग्लिश नाही तर ही पोरगी तब्बल १४ भाषा बोलते !!
हरियाणाच्या मालपूर नावाच्या गावात राहणारी १४ वर्षाची जान्हवी पनवार तब्बल १४ भाषा बोलते. सध्या सोशल मीडियावर जान्हवी सेन्सेशन आहे. तिला सोशल मीडियावर 'वंडर गर्ल' म्हणून ओळखले जात आहे.







