भारतातील ऑनलाईन शिक्षणातील सर्वात मोठे प्लॅटफॉर्म म्हणून बायजु या कंपनीची ओळख आहे. लॉकडाऊनमध्ये तर त्यांचा आलेख अजूनच वाढला. मुलं घरी बसून राहण्यापेक्षा बायजुवर नोंदणी करून नवीन गोष्टी शिकली. लॉकडाऊनमध्ये तब्बल २० लाख नविन विद्यर्थ्यांनी बायजुवर नोंदणी केली आहे. साहजिक कंपनीला आता अधिक लोकांची गरज पडणार आहे.
दिवसेंदिवस बायजुचा व्याप वाढत असल्याने अनेका मोठ्या गुंतवणूक संस्थांनी बायजुत गुंतवणूक केली आहे. एकूणच बायजु आता फोफावत आहे आणि त्यांना माणसांची गरज आहे. आजच्या लेखात आपण बायजुत कुठल्या कुठल्या कामांसाठी नोकरीच्या संधी आहेत ते बघणार आहोत.








