चालत्या रेल्वे समोर केला किकी डान्स....बदल्यात अशी शिक्षा मिळाली की तुम्ही विचारही केला नसेल !!

चालत्या रेल्वे समोर केला किकी डान्स....बदल्यात अशी शिक्षा मिळाली की तुम्ही विचारही केला नसेल !!

राव किकी चॅलेंजचा रोग दिवसेंदिवस पसरत चाललाय. आधी तर लोक कारमधून उतरून नाचायचे.  पण आता किकी डान्सच्या नवनवीन पद्धती येत आहेत. रिक्षाच्या बाहेर, सायकलवरून, एवढंच काय शेतात चिखलात उभं राहून पण लोक नाचतायत राव. पण मुंबईतील तीन तरुणांना हे किकी चॅलेंज महागात पडलंय.

निशांत शाह, ध्रुव शाह आणि श्याम शर्मा या तिघांनी चालत्या ट्रेनसमोर आणि अँब्यूलंससमोर किकी डान्स केला होता. डान्सचा व्हिडीओ त्यांनी सोशल मिडीयावर अपलोड केल्यानंतर तो २२ लाख लोकांनी पाहिला. हा व्हायरल व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्यांनी या तिघांना अटक केली आणि वसई रेल्वे न्यायालयात उभं केलं.

स्रोत

...पण शिक्षा म्हणून त्यांना ना जेल झाली, ना दंड म्हणून पैसे मागितले गेले. राव, त्यांना चक्क वसई स्थानक साफ करण्याची शिक्षा देण्यात आली आहे. त्यांना ३ दिवस स्टेशन साफ करायचंय आणि त्यासोबत असे चाळे न करण्याबद्दल जनजागृती सद्धा करायची आहे. न्यायालयानेच त्यांच्या कामाच्या वेळा ठरवून दिल्या आहेत. सकाळी ११ ते २ आणि दुपारी ३ ते ५. 

बरं ते सगळं राहूद्या, किकी चॅलेंजमुळे एक फायदा तर झाला. रेल्वेला बिन पगारी फुल अधिकारी सापडले ना भाऊ.

जर तुम्ही अजूनही गोंधळलेला असाल की हे किकी चॅलेंज म्हणजे काये? तर आमचा खालील लेख वाचायला विसरू नका.

हे किकी चालेंज काय आहे भाऊ ? किकी बद्दल सगळी माहिती फक्त एका क्लिकवर !!

टॅग्स:

marathi infotainmentbobhata marathiBobhatabobhata news

संबंधित लेख