21 जून ला या वर्षीचं सर्वात मोठं सूर्यग्रहण आपणा सर्वांना पाहायला मिळणार आहे. संपूर्ण वर्षातला सर्वात मोठा दिवस आणि सर्वात छोटी रात्र आपण २१ जून या दिवशीच आपण अनुभवणार आहोत. अंतराळात घडणाऱ्या अनेक घटनांचा परिणाम आपल्यावरती कुठल्या न कुठल्या तरी प्रकारे होतोच. यात काही जण विज्ञान शोधतात, तर काहीजण अंधश्रद्धा. पण निसर्गात होणाऱ्या एवढ्या मोठ्या प्रमाणातील घटनेचे साक्षीदार मात्र प्रत्येकाला व्हायचं असतंच. त्यामुळेच या लेखाच्या माध्यमातून आपण या वर्षीच्या सर्वात मोठ्या सूर्यग्रहणाबद्दल जाणून घेणार आहोत....
वर्षातलं सगळ्यात मोठं ग्रहण कधी लागणार, केव्हा संपणार, कसं दिसणार? सगळी उत्तरं इथेच!!


आता ग्रहण का घडतं हे तर आपण शाळेत असल्यापासून पाहात आलोय. जेव्हा चंद्र त्याची परिक्रमा पूर्ण करताना सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा चंद्रामुळे सूर्याकडून येणारा प्रकाश अडवला जातो आणि याच घटनेला आपण सूर्यग्रहण म्हणतो. चंद्र सूर्याला किती प्रमाणात अडवतो यावरून सूर्यग्रहणाचे देखील साधारणपणे तीन प्रकार पडतात. खूप दुर्मिळ परिस्थितीमध्ये तुम्हाला पूर्णपणे ग्रहण बघायला मिळते. नाहीतर इतरवेळी तुम्ही पूर्ण ग्रहण पाहू शकत नाही. साधारणपणे कमीत कमी दोन, तर जास्तीत जास्त पाच सूर्यग्रहणं वर्षभरात आपल्याला नक्कीच बघायला मिळतात. सध्याचं आगामी २१ जूनला होणारं सूर्यग्रहण मात्र पाहायचं असेल, तर आवश्यक ती काळजी घेऊनच ग्रहण पाहायला हवं.

सगळीच ग्रहणं जगात सगळीकडं दिसत नाहीत. मात्र हे सूर्यग्रहण आपल्याकडे भारतात बघायला मिळणार आहे. २१ जूनला भारतीय वेळेप्रमाणे साधारणपणे सकाळी ९:१५ मिनिटांनी या सूर्यग्रहणाला प्रारंभ होईल आणि साधारणपणे दुपारी ३:०४ मिनिटांनी सूर्यग्रहण समाप्त होईल.या सूर्यग्रहणादरम्यान सूर्य आपल्याला एखाद्या "अग्नीच्या गोलाकार अंगठी" प्रमाणे दिसेल. हे ग्रहण आपल्याला २१ जूनला कशाप्रकारे बघायला मिळेल याचं वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यानुसार सकाळी ९:१५ मिनिटांनी या ग्रहणाला प्रारंभ होईल. त्यानंतर १०:१७ वाजता आपण याचा काही प्रमाणात अनुभव घेऊ शकू. दुपारी १२:१० वाजता आपण हे सूर्यग्रहण पूर्णपणे अनुभवू शकतो आणि साधारणत: दोन वाजता हे सूर्यग्रहण संपेल.

२१ जूनला असलेलं हे सूर्यग्रहण यावर्षीचं पहिलं सूर्यग्रहण असेल आणि हेच वर्षातलं सर्वात मोठं सूर्यग्रहण असणार आहे. जर तुम्ही खगोलप्रेमी असाल आणि तुम्ही जर हे सूर्यग्रहण पाहू शकला नाहीत, तर मग मात्र तुम्हाला १५ डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागेल. असं म्हटलं जातं की अशा प्रकारचं ग्रहण हे खूपच दुर्मिळ असतं आणि पृथ्वीवरील काही भागातच बघायला मिळतं त्यामुळे जर आपल्याला हे ग्रहण अनुभवायला मिळणार असेल तर कुठलीही अंधश्रद्धा न बाळगता या अवकाशातील घटनांचे साक्षीदार आपण सर्वांनी नक्की व्हायला हवं.
तशा जगात सगळीकडे असतात तशा ग्रहणाबद्दल अनेक अंधश्रद्धा देखील आहेत. असं म्हटलं जातं की ग्रहण पाहणं अशुभ आहे वगैरे वगैरे. परंतु लक्षात घ्या वैज्ञानिकदृष्ट्या ही सर्व प्रक्रिया अंतराळात घडणाऱ्या घटनांचं प्रतिक आहे. अशा अनेक घटना अंतराळात नेहमी घडत असतात. त्यामुळे या सर्व गोष्टी विज्ञानाच्या दृष्टिकोनातूनच बघायला हव्यात.
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१