पृथ्वी सपाट आहे या गैरसमजुतीपासून आपण मानव आता बरेच पुढे आलो आहोत. ग्रह-ताऱ्यांवर बरीच संशोधने झाली आहेत, अजून चालूही आहेत. चंद्रावर तर माणसाने यशस्वीरीत्या पाऊल टाकले आहे. पण सूर्य सर्वात उष्ण , तेजस्वी तारा म्हणून ओळखला जातो. त्याच्या उष्णतेमुळे कुठलाही सजीव त्याच्या आसपास ही येऊ शकत नाही. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान ६००० केल्व्हिन आहे तर वातावरणाचे तापमान काही ठिकाणी दहा लाख केल्व्हिनच्यावर आहे. इतकी उष्णता की यात कोणीही जिवंत राहणे अशक्य आहे. त्यामुळे सूर्याच्या बाबतीतल्या संशोधनात अनंत अडचणी आहेत.
तिथं जाणं आणि अवकाशयान सूर्यावर उतरवणं अ श क्य आहे. पण समजा, हेच तापमान इथं, पृथ्वीवर निर्माण करता आलं तर या संशोधनात नक्कीच भर पडेल. याच उद्देशाने बरेच शास्त्रज्ञ कृत्रिम सूर्य किंवा तशा प्रकारचं अतिउष्ण तापमान पृथ्वीवर निर्माण करण्याचा गेली कित्येक वर्षे प्रयत्न करत आहेत. आज आम्ही अशाच एका बऱ्याच अंशी यशस्वी ठरलेलय एका प्रयोगाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या प्रयोगात सूर्याच्या तापमानाची बरोबरी करेल असं तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे. नक्की काय आहे हे तंत्रज्ञान?








