११ एप्रिल २०१९ पासून निवडणुका सुरु होत आहेत. मतदानास पात्र मतदारांनी आपलं नाव मतदार यादीत नक्कीच नोंदवलं असणार, पण ज्यांनी नाव नोंदवलेलं नाही त्यांना वाटत असेल की आपला चान्स तर गेला राव. निवडणूक अगदी जवळ आली असताना आता कुठे नाव नोंदवता येणार ?
मंडळी, आज आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर आणली आहे. अजूनही वेळ गेलेली नाहीय राव. राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टलनुसार (NVSP) उमेदवार नोंदणीच्या शेवटच्या तारखेपूर्वी १० दिवस अगोदर तुम्हाला नवीन मतदार म्हणून नाव नोंदणी करता येऊ शकते. २० मार्च नंतर तुमच्या मतदान ओळखपत्रात कोणताही बदल करता येणार नाही, पण नवीन मतदार नोंदणी सुरूच राहणार आहे.








