ठाण्याचा कोरम मॉल, आणि कॅडबरी जंक्शनचा भाग हा गजबजलेला आणि वर्दळीचा भाग आहे. अशा भागात बिबट्या शिरेल हे कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. सकाळपासून कॅडबरी भागात बिबट्या आहे अशी माहिती मिळाली होती, पण बिबट्या नेमका कुठे आहे याबद्दल कोणालाच माहित नव्हत. सर्वात आधी बिबट्या कॅडबरी कंपनीत शिरला, त्यानंतर ६ वाजेच्या सुमारास कोरम मॉलच्या पार्किंग मध्ये गेला. याबद्दल माहिती मिळे पर्यंत तो सत्कार हॉटेल मध्ये असल्याचं समजलं.
तोपर्यंत बिबट्याच्या बातमीने लोकांमध्ये घाबरट पसरली. वनाधिकाऱ्यांनी संपूर्ण जागेची शहानिशा करून बिबट्याला पकडण्याचं काम सुरु केलं. शेवटी बिबट्याला सत्कार हॉटेलच्या तळघरातून बंदिस्त करण्यात यश आलं आहे. बिबट्याला पकडण्यासाठी त्याला भूल देण्यात आली होती. खालील फोटो मध्ये सत्कार हॉटेलच्या बाहेर लावलेला पिंजरा आपण पाहू शकतो.