लष्कराच्या प्रमुख पदावर या मराठी माणसाची नियुक्ती....त्यांच्या कामाची व्याप्ती बघून अवाक व्हाल !!

लिस्टिकल
लष्कराच्या प्रमुख पदावर या मराठी माणसाची नियुक्ती....त्यांच्या कामाची व्याप्ती बघून अवाक व्हाल !!

मंडळी, लष्कराच्या एका प्रतिष्ठेच्या पदावर मराठी माणसाची नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट-जनरल मनोज मुकुंद नरवणे हे लष्करातले एक ज्येष्ठ सैनिक आहेत. त्यांच्यावर नुकतीच लष्कराच्या (भूदल) उप-प्रमुख पदाची म्हणजे शुद्ध मराठीत आर्मीचे व्हाईसचीफ ही जबाबदारी देण्यात आली आहे.

मंडळी, सध्या या पदावर लेफ्टनंट-जनरल देवराज अंबू काम करत आहेत. ते ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होतील. त्यांच्यानंतर लेफ्टनंट-जनरल मनोज मुकुंद नरवणे हे पद स्वीकारणार आहेत.

मनोज नरवणे यांच्या कामाचा आवाका आणि त्यांचा अनुभव बघता त्यांना लष्कर प्रमुखपदाचेही दावेदार मानले जातेय. येत्या ३१ ऑगस्ट रोजी सध्याचे लष्करप्रमुख बिपीन रावत हे सुद्धा सेवानिवृत्त होणार आहेत. त्यावेळी कदाचित नरवणे यांची लष्कर प्रमुख म्हणजेच आर्मी चीफ म्हणून नियुक्ती होऊ शकते.

मंडळी, चला तर यानिमित्ताने फ्टनंट-जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या कार्याविषयी जाणून घेऊया !!

मंडळी, चला तर यानिमित्ताने फ्टनंट-जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या कार्याविषयी जाणून घेऊया !!

मनोज मुकुंद नरवणे हे राष्ट्रीय सुरक्षा अकादमी आणि भारतीय सैन्य अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत. चेन्नई येथून त्यांनी सुरक्षानितीत म्हणजेच डिफेन्स स्टडीजमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. तसेच इंदोरच्या देवी अहिल्या युनिव्हर्सिटीत डिफेन्स आणि मॅनेजमेंटमध्ये एम.फिलही केलं आहे. 

सैन्यात आल्यानंतर त्यांनी ७ व्या शीख लाईट इन्फन्ट्रीत काम केलं. काश्मीर आणि ईशान्य भारतातल्या विद्रोह विरोधी कारवाईत ते कार्यरत होते. जम्मू काश्मीर येथील राष्ट्रीय रायफल्स बटालियनचं त्यांनी नेतृत्व केलं. ईशान्य भारतातल्या रायफल्स बटालियनसाठी त्यांनी इन्स्पेक्टर जनरल म्हणून काम केलं.

यांनतर त्यांनी भारताचे २० वे जनरल ऑफिसर कमांडर-इन-चीफ म्हणून काम केलं. याखेरीज आर्मी ट्रेनिंग कमांड, महू आर्मी वॉर कॉलेजसाठी प्रशिक्षक, म्यानमार येथील भारतीय सुरक्षा अधिकारी प्रतिनिधी अशा वेगवेगळ्या पदावर त्यांनी काम केलं. २०१७ च्या प्रजासत्ताक दिनाच्या कवायतीचे ते प्रमुख होते.

मंडळी, आपल्या ३५ पेक्षा जास्त वर्षांच्या कारकिर्दीत मनोज मुकुंद नरवणे यांनी फार मोठं काम केलं आहे. असा दांडगा अनुभव असलेल्या अधिकाऱ्याची लष्कराच्या उपप्रमुख पदी नियुक्ती होणे ही फक्त मराठी माणसासाठी नाही तर प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद बाब आहे.

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख