अपघाताबद्दल समजताच तिथे पोलीस आले. ताबडतोब ऍम्ब्युलन्सची व्यवस्था होऊ शकली नसल्याने पोलिसांनाच रुग्णांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. पोलिसांनी स्वतःच्या खांद्यावर रुग्णांना वाहून नेलं. या पोलीस तुकडीत एक पोलीस अधिकारी असे होते ज्यांचं सध्या कौतुक होत आहे.
एएसआय संतोष सेन हे ते पोलीस अधिकारी. काही वर्षापूर्वी चोरांशी झालेल्या चकमकीत त्यांच्या उजव्या हाताला गोळी लागली होती. तेव्हापासून उजव्या हाताने त्यांना नीट काम करता येत नाही. पण हात निकामी असूनही त्यांना काम करण्यापासून कोणी अडवू शकलं नाही. इतर पोलीस रुग्णांना वाहून नेत असताना तेही मागे नाही राहिले. त्यांनी देखील एका रुग्णाला खांद्यावर घेतलं. त्यांचं हे काम सध्या एका व्हिडीओच्या माध्यमातून जगभर पोचलं आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यांचं कौतुक केलं.
पोलीस रात्रंदिन नागरिकांची सेवां तर करतातच पण आणीबाणीच्या प्रसंगी अशाप्रकारे झोकून देऊन काम करायलाही मागे पुढे बघत नाहीत, ही घटना त्याचं मोठं उदाहरण आहे. संतोष सेन आणि त्यांच्या पोलीस तुकडीला सलाम !!