मंडळी, यावर्षी केरळमध्ये पावसाने तुफान आणलं. पण तुम्हाला माहित आहे का केरळमध्ये इतका पाऊस पडूनही केरळ हे भारतातलं सर्वात जास्त पाऊस पडलेलं ठिकाण नाही. यावर्षी सर्वात जास्त पाऊस चक्क महाराष्ट्रातल्या महाबळेश्वरमध्ये पडला आहे. महाबळेश्वरमध्ये तब्बल ५,६१९ मिलीमीटर पाऊस पडला आहे.

महाबळेश्वर (स्रोत)
मेघालयतल्या चेरापुंजी इथं सरासरी तब्बल ८००० मिलीमीटर पाऊस पडतो. पण यावर्षी या भागात पाऊस कमी पडला. चेरापुंजीत यावर्षी चक्क ४,७३०.२० इतकाच पाऊस पडला आहे. त्यामुळे महाबळेश्वरला बाजी मारता आली. हेच पुढे कायम राहिलं तर कदाचित महाबळेश्वरचं नाव सर्वात जास्त पर्जन्यमान असलेला भाग म्हणून कायमचं कोरलं जाईल.
महाबळेश्वरमध्ये हे पहिल्यांदाच घडलं आहे राव. याचं कारण असं की, पश्चिम बंगाल-ओडीसा भागातला कमी दाबाचा पट्टा मध्यभारताकडे सरकल्यामुळे महाबळेश्वर आणि आसपासच्या भागात सर्वाधिक पाऊस पडला आहे.
मंडळी, चेरापुंजीच्या नावावर २ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आहेत. ऑगस्ट १८६० आणि जुलै १८६१ सालादरम्यान चेरापुंजीमध्ये तब्बल २६,४७१ मिलीमीटर पाऊस पडला होता. हे पावसाचं प्रचंड प्रमाण पुढे कमी झालं, पण चेरापुंजीने आपलं स्थान आजवर टिकवलं होतं. पण कदाचित महाबळेश्वर लवकरच त्याची जागा घेईल.

चेरापुंजी (स्रोत)
तुम्हाला आठवत असेल दूरदर्शनवरती ७ च्या बातम्यांमध्ये महाराष्ट्रातील पर्जन्यमान रोज दाखवले जायचे आणि त्यात सर्वाधिक वृष्टी नेहमीच भिरा धरणाच्या परिसरात असायची. गेल्या काही वर्षाचे आकडे तपासले तर भिरेचे पर्जन्यमान ढासळत गेलेले आहे. कदाचित ही पर्यावरणाची समस्या असू शकते.
मंडळी, तुम्ही जर विचार करत असाल की हे मिलीमीटरमध्ये पाऊस कसा मोजतात तर आमचा खालील लेख वाचायला विसरू नका....
पाऊस कसा मोजतात ? पाऊस का मोजतात ? चला जाणून घेऊ !!
आणखी वाचा :
फक्त पावसाळ्यात दर्शन देणारे ११ भारतीय प्राणी !!




