दोन दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील एका तरुणाला इंस्टाग्रामवर बग शोधला म्हणून २२ लाखांचे बक्षीस मिळाले होते. आता सोलापूरच्या एका तरुणाची थेट इस्रोत शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. ही कामगिरी करणारा तो महाराष्ट्रातील पहिला तरुण आहे.
पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावाचा सोमनाथ माळी याची केरळच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर येथे सिनियर शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. यापूर्वी २०१६ साली सोमनाथने या पदासाठी अर्ज केला होता. पण तेव्हा त्याची निवड होऊ शकली नाही. यावेळी त्याने एम.टेकची डिग्री मिळवून पुन्हा अर्ज केल्यानंतर त्याची निवड झाली आहे.





