स्वतःच्या मनाप्रमाणे जगता यायला हवे ही प्रत्येकाची इच्छा असते. पण ते सर्वांसाठी शक्य होत नाही. अनेकांनी मोठी स्वप्ने पाहिली असतात. पण वय, जबाबदाऱ्या आणि परिस्थितीमुळे बरेचदा माणसाला तडजोड करायला भाग पडते. माणसाला सगळ्यात जास्त काही छळतो EMI!! अनेकांनी कर्ज काढलेले असते. हफ्ते चालू असतात. अशा परिस्थितीत त्यातून बाहेर पडणे शक्य होत नाही.
पण, अशा परिस्थितीतही काहीजण यातून बाहेर निघतात आणि स्वतःचे वेगळे विश्व निर्माण करतात. ते मग मोठे स्टार्टअप असू शकते किंवा छोटी वडापावची लॉरी!! आपले बॉस आपण स्वतः असावे फक्त याचसाठी तो अट्टाहास केलेला असतो.





