गझल, क्रिकेट हे आयटम भारत असो वा पाकिस्तान एक सारखेच लोकप्रिय आहेत. एकच वस्तू अशी आहे जी दोन्ही देशात कायम लोकप्रियतेच्या शिखरावरती असते. ती गोष्ट म्हणजे “आंबा” !
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात आंब्याला राष्ट्रीय फळाचं आढळस्थान मिळालेलं आहे. अर्थात काही फरक नक्की आहेत. ते असे की हापूस त्यांच्याकडे नाही आणि भारतात एकूण १२०० आंब्याच्या जाती मिळतात. तर, पाकिस्तानची दौड फक्त ४०० जातींपर्यंत आहे. पण जाऊ द्या, आपण कशाला जातीपातीत पडायचं.










