सगळ्यांनाच गाड्या हव्या हव्याशा वाटतात, पण एका गाडीची मात्र लोकांमध्ये दहशत आहे. अहो आपली ‘ओम्नी’ राव. लहानपणी ओम्नी बघून मुलांची घाबरगुंडी उडायची. सिनेमाने या कारला “अपहरण करणारी कार” म्हणून चांगलीच प्रसिद्धी दिली होती. या कारची डिझाईन बघा ना राव. कारला सरकणारे दार आहेत. कोणीही ओम्नी घेऊन यावं, दार लोटून माणसाला आत खेचावं आणि दार लावून पसार व्हावं. एवढं सोप्पं असतंय ते !!
आता किडनॅपींग कोणत्या वाहनात करणार ?? ओम्नी बंद झाली राव !!


आज ओम्नी अचानक आठवली कारण आता ओम्नीचं उत्पादन बंद होणार आहे. आश्चर्य म्हणजे ओम्नीला बाजारात आजही चांगली मागणी आहे, पण तरी मारुती सुझुकीने ओम्नीचं उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मग काय कारण असावं ??
तर, ओम्नी इतिहासजमा होणार आहे त्याचं एक मुख्य कारण आहे. ओम्नी मुळात सुरक्षित नव्हती. अपघात आणि डिझाईन मध्ये असलेली सुरक्षेची कमतरता या गोष्टी ओम्नीला घातक ठरल्या. या कारणाने मारुती सुझुकीने Eeco या ओम्नीच्या जुळ्या गाडीवर सगळं लक्ष केंद्रित केलं. Eeco चं नवीन व्हर्जन नुकतंच लाँच झालं आहे. नवीन सुरक्षा व्यवस्था या नवीन व्हर्जन मध्ये असतील. ओम्नी जरी नसली तरी Eeco हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

मंडळी, मारुती सुझुकीच नाही तर बऱ्याच मोठ्या कार उत्पादक कंपन्या जुन्या मॉडल्सचं उत्पादन बंद करत आहेत. कारण एकंच आहे “सुरक्षा”....विक्री कितीही तेजीत असली तरी सुरक्षा जास्त महत्वाची आहे.
राव काही बोला ओम्नी आपल्याला नेहमीच आठवत राहील. आता प्रश्न असा आहे की अपहरण करायचंच झालं तर कोणत्या वाहनातून करणार ?
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१