मुंबईत ‘कोलाबा-बांद्रा-सिप्झ मेट्रो’ म्हणजे ‘मेट्रो 3’चं काम अगदी जोशात सुरु आहे. नुकतंच ‘मेट्रो 3’ विभागाने नवीन यश पदरात पाडून घेतलंय. दादर येथील मेट्रो पर्यंतचं अंतर ओलांडून मेट्रो ३ पुढे निघाली आहे. आज आम्ही व्हिडीओ ऑफ दि डे मध्ये या क्षणाची एक खास झलक घेऊन आलो आहोत. मेट्रो ३ ने दादरच्या पुढे धडक दिल्यानंतर कसा जल्लोष झाला याची ही खास झलक बघा.
व्हिडीओ ऑफ दि डे : 'मेट्रो ३' ने दादरची सीमा ओलांडली....पाहा हा खास क्षण !!

मंडळी, जल्लोष करणारी माणसं ही मेट्रो ३ च्या कामात दिवसरात्र झटत असलेली इंजिनियर, सुपरवायझर आणि कामगार मंडळी आहेत. दादर येथील मेट्रो स्टेशन ओलांडून ‘टनल बोरिंग मशीन’ (TBM) बाहेर पडली तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.
या दोन्ही TBM मशीन्स मुंबई मेट्रो ३ चं काम करणाऱ्या १७ मशीन्स पैकी एक आहेत. या मशीन्सना ‘कृष्णा १’ आणि ‘कृष्णा २’ अशी नावे देण्यात आली आहेत. दोन्ही TBM चा प्रवास ऑक्टोबर २०१७ साली मुंबईच्या नया नगर पासून सुरु झाला. आज या मशीन्सनी २.४ किलोमीटरचं अंतर पूर्ण केलं आहे. हे खोदकाम कठीण होतं. मशीन्सना बेसॉल्ट, ब्रेशिया, टफ्फ (ज्वालामुखीय दगड) अशा प्रकारच्या दगडांचा चुरा करत आपला मार्ग काढायचा होता. त्यांनी हे काम उत्तमरीत्या पार पडलंय.

मंडळी, आजच्या घडीला ‘मुंबई ३’ प्रकल्पाने ३५ टक्के काम पूर्ण केली आहे. मुंबईकरांचं वेगवान प्रवासाचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल.
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१